सासन फाट्याजवळ आज सकाळी १० वाजता अचानक प्रवासी ऑटो पलटी झाल्याची घटना घडली.या अपघातात ऑटोमधील अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना मदत कक्षच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.गोपाल अरबट,राहुल भुंबर,बंटी कुऱ्हाडे आणि सागर गेठे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.