हिंगणघाट: शहरात विद्युत तार अंडरग्राउंड करून होणारी वृक्षतोड थांबवा; आधार फाउंडेशनचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
हिंगणघाट शहरात विद्युत तार अंडरग्राउंड करून होणारी वृक्षतोड थांबवावी या प्रमुख मागणीकरिता आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात सर्व सदस्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रातून देण्यात आली आहे.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की. हिंगणघाट शहरामध्ये विद्युत तारा अंडरगाऊंड करावी कारण दरवर्षी वाढत असलेले तापमान लक्षात घेता पर्यावरणविषयी जागरूक असलेल्या विविध सामाजिक संस्था व संघटना वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे.