हिंगणघाट: तहसील कार्यालयात तहसीलदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली ७६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत
हिंगणघाट तहसिल कार्यालयात आगामी काळात १३ जून २०२५ ते १२ जून २०३० या कालावधी करिता तालुक्यातील ७६ सरपंच पदांचे प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता तहसीलदार योगेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत तालुक्यातील एकूण ७६ ग्रामपंचायत मधील सरपंचांची सोडत काढण्यात आली.