हिंगणघाट: शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन कपाशीच्या एचटीबीटी बियाण्याला परवानगी द्या, आमदार समीर कुणावार यांची सभागृहात मागणी
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ४ जुलै रोजी २ वाजून ३७ मिटांंनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सभागृहाचे लक्ष वेधत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कपाशीच्या बिटी थ्री, बिटी फोर बियाण्यात होत असलेली फसवणूक लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन बंदी असलेल्या एचटिबीटी बियाण्याच्या लावडीची परवानगी देण्याची मागणी केली आहे.