हिंगणघाट: कडाजना शिवारात बिस्किटे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग: आगीत ट्रक जळून मोठ्या प्रमाणात नुकसान
हिंगणघाट नंदोरी रोड वरील कडाजना शिवारात पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास आयशर ट्रकला आग लागल्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक क्रमांक MH 40AK1536 हा कडाजना शिवारात असलेल्या पारले कंपनीच्या गोडाऊन मधून हिंगणघाट येथून वणी येथे पार्ले कंपनीचे बिस्किट घेऊन जात असताना अचानक ट्रकने पेट घेतला. या भीषण आगीचे माहिती हिंगणघाट अग्निशामक दलाला मिळतात घटनास्थळी जाऊन ट्रक ला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले.या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून ट्रक जळून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.