हिंगणघाट: शहरातील संत ज्ञानेश्वर वार्डातील शालगंडी परीसरातील दोन घरांना आग: आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान
हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड शालगंडी परिसरात रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दोन घरांना भिषण आग लागली असुन या आगीत दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार २ जुलै रोजी साडेदहा वाजताच्या सुमारास संत ज्ञानेश्वर वार्ड परिसरात राहणाऱ्या किशोर कांबळे व सुनील बोटरे या दोघांचे कुटुंब घरी नव्हते परिसरातील नागरिकांना आगीचे लोट दिसतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान घराला आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून दोन घरांना आपल्या कवेत घेतले.