अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा तसेच प्रशासकीय अडचणींचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी शासन स्तरावर प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यांचा विहित वेळेत प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील पोलिसिंगमधील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुन्हे प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.
महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मा. पंतप्रधानांनी अपेक्षित केलेले स्मार्ट पोलिसिंग नागपुरात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वंकष पावले उचलण्याचे आवाहन श्रीमती म्हैसकर यांनी केले.
याप्रसंगी उत्कृष्ट तपास करून दोषसिद्धी मिळविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
4.6k views | Nagpur, Maharashtra | Jul 15, 2026