कामठी: जुनी कामठी येथून २३ वर्षीय तरुण बेपत्ता; शोधाशोध सुरू
Kamptee, Nagpur | Jul 13, 2026 जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अर्जुन दशरथ करोसिया वय २३ वर्षे हा तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अर्जुन हा ९ जुलै रोजी सायंकाळी ५:०० वाजल्यापासून कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडला, तो अद्याप परत आलेला नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु तो मिळून आलेला नाही.