गडचिरोली पोलीसांची अवैध दारू व्यवसायाविरोधात आणखी एक प्रभावी कारवाई.
अवैध दारू साठवणूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारी अनधिकृत इमारत नगर परिषद आरमोरी यांच्या समन्वयाने जमीनदोस्त करण्यात आली.
यापूर्वीच्या कारवाईत आरोपीकडून अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी मोहा दारू, चारचाकी वाहनासह एकूण ₹15,65,180 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुढील तपासात संबंधित इमारतही अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कायद्यानुसार ती पाडण्यात आली.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही. अवैध व्यवसाय आणि त्यांना आश्रय देणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरुद्धही सातत्याने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.
#GadchiroliPolice #IllegalLiquor #LawEnforcement #Armori #CrimeFreeGadchiroli MaharashtraPolice
49 views | Gadchiroli, Maharashtra | Aug 2, 2026