दोन वेगवेगळ्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणांचा छडा; आरोपी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात!
गडचिरोली पोलिसांनी दोन स्वतंत्र ऑनलाईन फसवणूक प्रकरणांचा तपास करत आरोपींना अटक केली. पहिल्या प्रकरणात 07 युवतींच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यांचा म्युल अकाऊंट म्हणून वापर करून ₹1.04 कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 05 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसऱ्या प्रकरणात सोशल मीडियावर बेडशीट विक्रीच्या बनावट जाहिरातीद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माग काढत गडचिरोली पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.
⚠️ गडचिरोली पोलिसांचे आवाहन — आपल्या नावाने बँक खाते उघडून देऊ नका तसेच ATM Card, Passbook, PIN, SIM Card किंवा वैयक्तिक कागदपत्रे इतरांच्या वापरासाठी देऊ नका. सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती�
Gadchiroli, Maharashtra | Oct 17, 2026