भोकरदन: राजुर येथे श्री गणपती मंदिर परिसराची मा. कें.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा.दानवे यांनी रोड रोलर चालवत केली स्वच्छता
आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे श्री गणपती मंदिर परिसराची भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी रोड रोलर चालवत स्वच्छता केली आहे कारण उद्या दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी मंगळी चतुर्थी निमित्त राजुर नगरी श्री राजुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित होणार असून या भाविकांना सुख सुविधा पुरवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.