भोकरदन: पोलीस ठाणे येथे रक्षाबंधनानिमित्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बांधल्या आपल्या सहकारी पोलीस बांधवांना राख्या
आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन पोलीस ठाणे येथे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधनानिमित्त आपल्या सहकारी पोलीस कर्मचारी बांधवांना राख्या बांधत रक्षाबंधन सण हा मोठ्या उत्सवात साजरा केला आहे ,याप्रसंगी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलिस अधिकारी कर्मचारी यांना महिला कर्मचाऱ्यांनी राख्या बांधत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे, यावेळी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित झाले होते.