भोकरदन: हसनाबाद येथे गड्ड्यात बसून रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ऑ.इंडिया पॅंथर सेनेच्या तालुकाध्यक्षान केले आंदोलन
आज दिनांक 28 जुलै 2025 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे भोकरदन तालुका अध्यक्ष किशोर शेजुळ यांनी खराब झालेल्या रस्त्याच्या पाण्याच्या गड्ड्यात बसून आंदोलन केले आहे याप्रसंगी त्यांनी मागणी केली आहे, की हसनाबाद ते सिरसगाव वाघरुळ या 4 किलोमीटर अंतर रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाला असून ठिकठिकाणी गड्डे पडले आहेत व यामध्ये पाणी सुद्धा साचल्याने रोज अपघात होत आहे, त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले.