रामटेक: अवघ्या काही महिन्यातच मानापुर - नगरधन मार्गावर पडले मोठे खड्डे, निकृष्ट बांधकामाच्या चौकशीची मागणी
Ramtek, Nagpur | Aug 8, 2026 सार्वजनिक बांधकाम उपविभाग रामटेक अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मानापुर ते नगरधन दरम्यान करोडो रुपयांच्या वर निधी खर्च करून बनविलेल्या मार्गावर अवघ्या काही महिन्यातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. या मार्गावरील मोठ्या कालव्याजवळ लहान पुलावर भगदाड पडून मोठे खड्डे पडल्याने या मार्गाच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.