रामटेक: मानसिक तणावातून अंबाळा रामटेक येथे एका 17 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
Ramtek, Nagpur | Aug 11, 2026 न. प.रामटेक अंतर्गत अंबाळा येथील एका सतरा वर्षीय मुलाने मानसिक तणावातून आपल्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 11 ऑगस्टला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान घडली. मृतक मुलाचे नाव मयंक योगेंद्र द्रूगकर वय 17 वर्षे असे असून याच वर्षी त्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.