धुळे: जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी केली पांझरा नदी परिसरात पूर परिस्थितीची पाहणी
Dhule, Dhule | Aug 24, 2024 भारतीय हवामान खात्याने धुळे जिल्ह्यास शुक्रवारी रेड अलर्ट तर शनिवारी यलो अर्लट जाहीर केला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. विशेषतः साक्री तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे पांझरा, जामखेडी, मालनगाव प्रकल्पातून पाण्याचा येवा सतत वाढतच आहेत. तसेच निम्न पांझरा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीपात्रासह इतर नदीनाल्यांना पूर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पांझरा नदीपात्रास भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली.