धुळे: बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर वडजाई रोड परिसरात चाळीसगाव रोड पोलीस प्रशासनातर्फे शाळा तपासणी मोहिमेला सुरुवात
Dhule, Dhule | Aug 24, 2024 बदलापूर येथील शाळेत झालेल्या बाल अत्याचाराच्या घटनेनंतर आता संपूर्ण राज्यामध्ये मुलींच्या शाळेमधील सुरक्षेचा प्रश्न समोर आलेला आहे, आणि याच पार्श्वभूमीवर धुळे शहरात देखील याची खबरदारी घेतली जात आहे, पोलीस प्रशासनातर्फे धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील सर्व शाळांमध्ये पोलीस अधिकार्यांतर्फे पोहोचून स्वतः मुलींच्या सुरक्षेची पाहणी केली जात आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या उपस्थितीत या शाळेत तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली.