धुळे: गरताड बारी परिसरात कार दरीत कोसळल्याने एक जण ठार तर चौघे जखमी, मोनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 24, 2024 धुळे सोलापूर महामार्गावरील गरताड बारीच्या उतारावर भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळून तरुण ठार तर चौघे जखमी झाले. याप्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल साईनाथ नवले असे मृत व्यक्तीचे नाव आहे.