शहादा: म्हसावद येथे बंद घराचा दरवाजा तोडून ३ लाख ७ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी, म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे बंद घराचा दरवाजा तोडून रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ७ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना ९ मार्चला पहाटे घडली. यांनतर पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अनिल पाटील यांच्या तक्रारीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.