शहादा: सारंगखेडा बॅरेज मधून ३० हजार रुपये किंमतीच्या डिझेलची अज्ञात चोरट्यांनी केली चोरी
शहादा तालुक्यातील सारंखेडा येथील तापी नदीवर असलेल्या बॅरेजमधून अज्ञात चोरट्यांनी 9 मार्च रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास सुमारे 30 हजार रुपये किमतीचे डिझेल चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी सारंखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.