शहादा: काथर्दे दिगर गावाजवळ कारला एसटी बसने ओव्हरटेक केल्याचा राग येऊन बस चालकाला कारचालकासह दोघांनी केली मारहाण
शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे कारला एसटी बसने ओव्हरटेक केल्याचा राग येऊन कार चालकाने बस चालकाला मारहाण केली. याप्रकरणी कारचालक व २ अज्ञात साथीदारांविरोधात ७ मार्च रोजी शहादा पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. शहादा येथील बस आगारातील एस.टी. चालक सोपान भास्कर सूर्यवंशी हे शहादा-नंदुरबार बस घेऊन जात असताना काथर्दे दिगर पुनर्वसन वसाहतीजवळ त्यांनी एमएच १४ बीके ०४६५ या क्रमांकाच्या कारला ओव्हरटेक केल्याने हा वाद झाला.