शहादा: वडाळी येथे कौशल्य सोनार यांच्या ज्वेलर्स दुकानात चोरी, सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील वडाळी येथील शहादा-जयनगर रस्त्यावरील मेन बाजार पेठेतील कौशल्य संजय सोनार यांच्या धनाई पुनाई ज्वेलर्सचे दि.१० मार्च रोजी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेरा मोडतोड करून ४ ते ५ अज्ञात चोरट्यांनी शटर धारदार कटर टॉमीने तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ३७ हजार ८०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली ही चोरीची घटना याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अज्ञान चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.