शहादा: भोंगरा,चांदसैली,शहाणा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला
शहादा तालुक्यातील भोंगरा,चांदसैली,शहाणा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे शहादा तालुक्यातील विविध गावातील सरपंच व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भोंगरा येथे गावातून विकास कामांचा भूमिपूजना पूर्वी रॅली काढण्यात आली.