शहादा: मीरा प्रताप लॉन्समध्ये मंत्री विजयकुमार गावित आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गॅस शेगडीचे वाटप
शहादा शहरातील मीरा प्रताप लॉन्स येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले. उज्वला गॅस योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांना रविवारी दुपारी हे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे आणि उद्योगपती शशिकांत पाटील यांची उपस्थिती होती.