घाटकोपर पश्चिम येथे भाजपकडून तिरंगा रॅली
आज दिनांक 18 मे 2025 वेळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास घाटकोपर पश्चिम भाजप विधानसभा यांच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली पहलगाम आतंकी भ्याड हल्ल्याच्या नंतर सैन्य दलाने सिंदूर ऑपरेशन अंतर्गत दहशतवाद्याचे अनेक तळ नष्ट केले आहे सैन्य दलाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली आज अमृत नगर सर्कल ते सर्वोदय हॉस्पिटल घाटकोपर अशी काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी या तिरंगा रॅलीमध्ये दाखल होत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.