साकीनाका मेट्रो स्टेशन ते सेंट स्कूल येथील वाहतूक कोंडीची प्रशासनाने पाहणी
आज दिनांक 17 मे 2025 वेळ सकाळी 11:40 च्या सुमारास मनसे चांदीवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुषाली यांनी अनेकदा साकीनाका मेट्रो स्टेशन ते सेंट स्कूल वाहतूक कोंडी बाबत पत्रव्यवहार केला होता त्या अनुषंगाने आज वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील मुंबई महानगरपालिका रस्ते विभागाचे अभियंता रोहन तारी यांनी पाहणी करून रस्त्यातील दुभाजक वाहतूक कोंडी याबाबत लवकरच या ठिकाणी उचित कारवाई करून वाहतूक कोंडी मोकळी केली जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती महिंद्र भानुषाली यांनी दिली.