दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील सुपुत्र स्वर्गीय अर्जुन श्रीकांत सोनवणे याचे कोटा रेल्वे स्थानक नजीक तोल जाऊन रेल्वेतून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला स्वर्गीय अर्जुन सोनवणे हा पंजाब मध्ये आयोजित भारतीय अंतर्विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तो परत येत असताना त्याला राष्ट्रीय पदक हे मिळाले होते . परंतु त्याचा रस्त्यातच तोल जाऊन रेल्वेतून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याने दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले .