हिंगणघाट: विधानसभा क्षेत्रातील लाडक्या भगिनींनी मुख्यमंत्री देवाभाऊंना पाठविल्या ३६०६ राख्या:भाजपा महिला मोर्चाचा पुढाकार
हिंगणघाट: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या भावाला रक्षाबंधनाचे औचित्य साधून हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील लाडक्या भगिनींनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छांसह सुमारे ३६०६ राख्याचासमावेश असलेले हे बॉक्स हिंगणघाट शहराच्यावतीने वर्धा येथे आजच पाठविण्यात येणार आहे,आज आ. समिर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात एकत्रित होऊन नियोजन केले. राज्याचे मुख्यमंत्रीपदी आरूढ असलेल्या या पितृतुल्य भावास उत्तम आरोग्य लाभो, त्यांची किर्ती अबाधित राहो, अशी ईश्वरचरणी मनोकामना केली.