हिंगणघाट: टाका ग्राऊंड येथे हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक:डिबी पथकाची कारवाई
हिंगणघाट शहरातील टाका ग्राऊंड येथे हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली असून यासंबंधी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे हि कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक देवेद्र ठाकुर यांचे आदेशाने डिबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.