हिंगणघाट: राष्ट्रीय महामार्गावरील शहरालगतच्या मोहता बगीच्या जवळ कार व मोपेडचा अपघात, मोपेड चालक गंभीर जखमी
हिंगणघाट :शहरालगतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मोहता बगीच्या समोर कार व मोपेड जबर अपघात झाला.या धडकेत मोपेड चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील वेगवान चारचाकीने समोरून येणाऱ्या मोपेडला धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की मोपेड रस्त्यावर फेकली गेली आणि चालक काही अंतरावर पडला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.