हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस सज्ज! बंदोबस्त आणि VIP–VVIP सुरक्षेचा आढावा
आगामी हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, अधिवेशन काळातील पोलीस बंदोबस्ताचे नियोजन तसेच VIP आणि VVIP व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
मा. श्री. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीस नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अधिवेशन काळातील बंदोबस्ताचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा आणि VIP–VVIP व्यक्तींच्या सुरक्षिततेसंदर्भात विविध महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.
हिवाळी अधिवेशन शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि सुरळीत पार पडावे यासाठी नागपूर शहर पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.
नागपूर शहर पोलीस — आपली सुरक्षा, आमची जबाबदारी!
#NagpurCityPolice #WinterSession2026 #NagpurPolice #VIPSecurity #PublicSafety