आर्थिक गुन्हे शाखेतील प्रलंबित प्रकरणांचा आढावा व तपासातील गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण बैठक!
आर्थिक गुन्हे शाखेतील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी तसेच तपास प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता व गुणवत्तापूर्ण सुधारणा घडवून आणण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस मा. अपर पोलीस आयुक्त श्री. दाभाडे सर तसेच मा. पोलीस उपआयुक्त (EOW) श्रीमती मेहक स्वामी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रलंबित गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तपासातील त्रुटी दूर करणे, तपासाला गती देणे, पुराव्यांचे प्रभावी संकलन, तपासाची गुणवत्ता सुधारणे तसेच वेळेत व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे यासंदर्भात सविस्तर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
प्रभावी तपास, वेळेत कार्यवाही आणि आर्थिक गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी कटिबद्ध!
#NagpurPolice #EOW #CrimeInvestigation #NagpurCityPolice
2 views | Nagpur, Maharashtra | Nov 17, 2026