भोकरदन: अनवा येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी केले अनवा पिंपळगाव रोडवर रास्ता रोको आंदोलन
आज दिनांक 24 जुलै 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन तालुक्यातील अनवा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुवाद ते पिंपळगाव रेणुकाई या मुख्य रोडवर रास्ता रोको आंदोलन करत मागणी केली आहे, की आमच्या शाळेत शिक्षकांचे पदे रिक्त आहे, त्यामुळे आमचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होत नाही त्यासाठी प्रशासनाने वेळीच शिक्षक नियुक्त करावे अशी मागणी करत या विद्यार्थ्यांनी आजही रास्ता रोको आंदोलन केल आहे. याप्रसंगी पालक वर्ग विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती.