भोकरदन: हसनाबाद येथील अतिक्रमण काढा,नसता27 जुलै ला-आंदोलन बांधकाम विभागाल ऑल इंडिया पॅंथर सेनेचे निवेदन देऊन इशारा
आज दिनांक 23 जुलै 2025 वार बुधवार रोजी दुपारी1 वाजता भोकरदन येथील बांधकाम विभागाला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे भोकरदन तालुका अध्यक्ष किशोर शेजुळ यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे की भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील मुख्य रोडवर व सिरसगाव वाघरुळ या रोडवर झालेली अतिक्रमण तात्काळ काढावे तसेच या संदर्भात त्यांनी अगोदर सुद्धा निवेदन दिले,मात्र काही फायदा झाला नाही,त्यामुळे आज त्यांनी निवेदन देऊन प्रशासनाला इशारा दिला आहे की 27 जुलैपर्यंत अतिक्रमण न काढल्यास हसनाबाद येथे घडयात बसून आंदोलन करणार