हिंगणघाट: यशोदा आलेल्या पुरामुळे अल्लिपुर अलमडोह मार्ग बंद:अनेक गावाचा संपर्क तुटला: शेकडो हेक्टर जमिनीवरील पिक पाण्याखाली
हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस शुरू झाल्याने यशोदा नदिला पुर आला असून आज सकाळी ८ वाजेपासून अल्लिपुर अलमडोह मार्ग बंद झाला असून शेकडो हेक्टर जमिनवर पिक पाण्याखाली गेले आहे. या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वर्धा ते कानगाव पर्यंत मार्ग बंद झाला असून परीसरातील गावाचा संपर्क तुटला आहे. तर गाडेगाव,अलमडोह,सोनेगाव, चानकी,दरने टाकळी,मनसावळी.या भागातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेले आहे.