हिंगणघाट: डिबी पथकाची शहर परीसरात दोन ठिकाणी अवैध दारू विक्री विरोधात कारवाई:१ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने रिमडोह सव्हीस रोड व आंजती कँनल रोड वर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करीत १ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथक पेट्रोलिंग करीत असताना पथकाला रिमडोह सव्हीस रोड व आंजती कँनल रोडने शहरात अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पथकाने रवाना होऊन दोन्ही ठिकाणी कारवाई केली आहे.