हिंगणघाट: नांदगाव(बो) येथील जिल्हा परिषद शाळेला आमदार कुणावार यांची भेट; शालेय साहित्याकरिता १० लाखाचा निधी देऊन शाळा घेतली दत्तक
हिंगणघाट तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदगाव (बोरगाव) येथे आमदार समीर कुणावार यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे प्रेरणादायी संकल्पनेतून"एक पेड मा के नाम" उपक्रमांतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण केले.यावेळी शालेय साहित्याकरिता आमदार निधीतून १० लक्ष रुपयाचा निधी तात्काळ मंजूर करीत सोबतच शाळा दत्तक सुद्धा घेतली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके सुद्धा वितरित करण्यात आली