हिंगणघाट: नांदगाव उड्डाणपूलावर भरधाव वेगाने धावणाऱ्या आयशरची उभ्या ट्रकला धडक, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
हिंगणघाट, नादुरुस्त ट्रकला भरघाव धावणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने सुलतानसिंग बामेल(६०) या वाहनचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा वाहनचालक गंभीर जखमी होऊन त्याचे दोन्ही पायाला मोठी दुखापत झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव उड्डाणपूलावर घडली.प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यातील डवरा येथील वाहन चालक शैलेंद्र चव्हाण तसेच क्लीनर गगन बाथम हे आपल्या ट्रक क्र. एम. पी.०७/एच बी ५८२७ या वाहनाने आंध्र प्रदेशातून ग्वाल्हेर येथे जाण्यास निघाले होते.