रामटेक: गावच्या जेन - झी ने बुजविले ग्रामपंचायत नवरगाव अंतर्गत रस्त्यावरील खड्डे ; केली गांधीगिरी
Ramtek, Nagpur | Aug 21, 2026 रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव गट ग्रामपंचायत येथील रस्त्यांवर बरेच खड्डे झाले होते.ही समस्या ग्रामपंचायत सरपंच व प्रशासनास वारंवार लक्षात आणून दिल्यावरही त्यांनी याकडे लक्ष न दिल्याने अखेर नवरगावातील जेन - झी अर्थात तरुणाई समोर आली व त्यांनी स्वतःच्या पैशातून वर्गणी गोळा करून साहित्य आणले व शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट च्या रात्री श्रमदान करून हे खड्डे बुजविल्याची घटना समोर आली आहे.