ताडीवाला रोडवर मध्यरात्री झाड कोसळले; तातडीने मदतकार्य, मोठी दुर्घटना टळली...
.
.
पुण्यातील मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर रोड, ताडीवाला रोड येथे आज (२३ जून २०२६) मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अचानक एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. झाड कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तात्काळ अग्निशामक दल आणि महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला पाचारण करण्यात आले.
या मदतकार्यात नगरसेवक मा. जयप्रकाश पुरोहित, सुजित आप्पा यादव आणि पोलीस हवालदारांनी स्वतः उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या सामूहिक आणि जलद प्रयत्नांमुळे मध्यरात्रीच झाड तोडून बाजूला करण्यात आले आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला. सुदैवाने, मध्यरात्रीची वेळ असल्याने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
.
.
.
#TadiwalaRoad #PuneNews #TreeFall #PuneFireBrigade #PMC #AlertCitizens #PublicService #BreakingNewsPuneTadiwalaRoad #PuneUpdates #DisasterManagement #PuneFireBrigade #PublicService #AlertLeader #PuneCity #PMC #PuneTraffic #SafetyFirst #TadiwalaRoadNews #SocialWork
Haveli, Pune | Jun 23, 2026