अक्कलकुवा: मालपाडा शिवारात मालकी शेतात अतिक्रमण धारकांचा पेरणीसाठी मज्जाव ; मोलगी पोलीसात ६ जणांवर गुन्हा दाखल
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा गाव शिवारात योगेश पाडवी यांच्या मालकीचे शेत असून या शेतात काही अतिक्रमण धारकांनी त्यांनाच 21 जून रोजी दुपारी पेरणीसाठी मज्जाव करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी 21 जून रोजी रात्री मोलगी पोलीस ठाण्यात योगेश पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश तडवी प्रदीप तडवी आणि चार महिला अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.