अक्कलकुवा: विश्व आदिवासी गौरव दिवस नियोजन बैठक अक्कलकुवा येथील कुबेर पार्क येथे संपन्न
अक्कलकुवा येथील कुबेर पार्क मधील नागेश पाडवी यांच्या निवासस्थानी विश्व आदिवासी गौरव दिवस नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. यात आदिवासी समाजाचे अस्तित्व कसे टिकून राहील, समाज विविध व्यसनाधीनते कडे वळत असल्याने त्यांना योग्य वेळी योग्य प्रबोधनाची गरज असुन याकडे भर देवुन कार्यक्रमांचे नियोजन करण्याविषयी बैठकीत उपस्थित मान्यवरांमध्ये चर्चा करण्यात आली.