पुणे - बेंगळुरू मार्गावर भीषण अपघात; किवळे येथील साई द्वारका सोसायटी जवळ नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार 25 ते 30 फूट दूर जाऊन पडला
#punebangluruhighway #accident #bikeaccident
#news #pune
किवळे : पुणे-बेंगळुरू महामार्गाजवळ साई द्वारका सोसायटीच्या एक्झिटसमोर बुधवारी रात्री एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो एक्झिटच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेतून थेट उडून सुमारे 25 ते 30 फूट पुढे मोकळ्या जागेत जाऊन पडल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साई द्वारका सोसायटीच्या एक्झिटसमोर पत्रे लावण्यात आलेली नसलेल्या भागातून दुचाकीस्वार जात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी थेट पुढे गेली आणि दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्याच्या पलीकडील मोकळ्या जागेत जाऊन कोसळला.
अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकीस्वार सुमारे 25 ते 30 फूट अंतरावर जाऊन पडला. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चि�
Pune City, Pune | Sep 23, 2026