⚖️ **Instagram अकाउंट सस्पेंशन प्रकरणी दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!**
Instagram अकाउंट बंद झाल्यास थेट हायकोर्टात याचिका दाखल करता येते का? दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
सार्थक भगत विरुद्ध केंद्र सरकार प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले की, Meta ही खासगी संस्था असल्याने तिच्याविरोधात अनुच्छेद 226 अंतर्गत थेट रिट याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक सार्वजनिक कर्तव्याची अट पूर्ण होत नाही.
न्यायालयाने Meta विरोधातील मागण्यांसाठी दिवाणी दाव्याचा पर्याय योग्य असल्याचे नमूद केले. तसेच Grievance Appellate Committee (GAC) ला प्रलंबित अपील लवकर निकाली काढण्याचे निर्देश दिले.
📌 या निर्णयाचा नेमका अर्थ जाणून घ्या या विशेष पोस्टमध्ये.
📲 अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Follow करा – **@timesofmaharashtranews**
#TimesOfMaharashtra #DelhiHighCourt #InstagramNews
Pune City, Pune | Nov 13, 2026