अक्कलकुवा: बोलेरो वाहनाच्या टपावरून पडल्याने २२ वर्षीय युवकाचा मृत्यू; मोलगी पोलीस ठाण्यात प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीपाटी गावाजवळ ७ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास संतोष वसावे हा युवक बोलेरो वाहन क्रमांक एम एच १९ बी जे ९५६० च्या टपावरून आपली बॅग काढत असताना चालकाने वाहन जोरात पुढे चालून नेले. या अपघातात संतोष वसावे हा खाली पडून जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी १३ जून रोजी रात्री मोलगी पोलीस ठाण्यात वाहन चालक यशवंत पाडवी याच्या विरुद्ध प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.