अक्कलकुवा: कृषी विभागाची कारवाई अक्कलकुवा बस स्थानकाजवळ गुजरात बसमधून पकडले अवैद्य एचटीबीटी बियाणे
नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून दिनांक ७ जून रोजी सकाळी प्राप्त माहितीनुसार ६ जून रोजी दुपारच्या वेळेत कृषी विभागाच्या पथकाने अक्कलकुवा बस स्थानकाजवळ मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या एचटीबीटी बियाण्याची अवैद्य वाहतुकीवर कारवाई करत अंदाजीत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.