हिंगणघाट: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार गर्भवती करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावणी २५ वर्ष कारावास शिक्षा
हिंगणघाट शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला २५ वर्षांचा कारावास व दंड तसेच भादवीच्या कलम ३७६ (२) (एन) अंतर्गत २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी वकील दिपक वैद्य यांनी प्रसिद्ध पत्रातून दिली आहे.या प्रकरणी सरकार तर्फे सरकारी वकिल म्हणुन दिपक वैद्य यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले व त्यांनी शासनातर्फे एकुण १८ साक्षदार तपासले व प्रखरपणे बाजु मांडुन युक्तीवाद केला.