बदनापूर: वजरखेडा ते पिंपळगाव कोलते या रस्त्याची दुरावस्था, संबंधित विभागाचे दुर्लक्ष
Badnapur, Jalna | Jul 15, 2026 आज दिनांक 15 जुलै 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील वजरखेडा ते पिंपळगाव कोलते या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याची पहायला मिळाली आहे ,पाऊस पडल्यावर व पावसाळ्यात या रस्त्यावर चोही कडे चिखल होतो, यामुळे ट्रॅक्टर ,जेसीबी फसतात त्या मुळे स्थानिक नागरिकांनी स्वखर्चातून यावर मुरूम टाकत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली आहे, मात्र याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन उपाय योजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.