वर्धा: 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
Wardha, Wardha | Jan 25, 2026 वभारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या दि. 26 जानेवारी रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सकाळी 9.15 वाजता पोलीस मुख्यालय, कवायत मैदान येथे होणार आहे.ही माहिती दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास प्राप्त झाली आहे.