वर्धा: वर्धा जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याला वेग; ६२५ शासकीय कार्यालयेसह ३,४३० मोबाईल टॉवर्सला जोडले
Wardha, Wardha | Jan 25, 2026 ऊर्जा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला गती दिली आहे. वर्धा जिल्ह्यात ६२५ शासकीय कार्यालयेसह ३,४३० मोबाईल टॉवर्सना स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, त्यामुळे बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. मीटर रीडिंग न होणे किंवा सरासरी वीजबिल येणे अशा तक्रारी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी तत्पर असून, या आधुनिक बदलाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आ